Breaking News

कारागृहात दोघा आरोपींची हाणामारी


श्रीगोंदा / प्रतिनिधी 
श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील आरोपी राजू पवार वय वर्षे 40 व कर्जत तालुक्यातील जलालपुर येथील आरोपी मंगेश चव्हाण वय वर्षे 24 यां दोघा कैद्यांमध्ये कस्टडीत मारामारी झाली, यावेळी लॉकप पहारा करीत असलेल्या पो.कॉ. भापकर व कोपनर यांना गार्ड अंमलदार खामकर मॅडम यांनी तात्काळ आदेश करीत, दोघांना लॉकपमध्ये जाऊन भांडण सोडविले व भांडणा दरम्यान दोघांना किरकोळ दुखापत झाली होती, त्यासाठी त्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. भा.दं. वि.कायदा कलम 160 नुसार या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास दहीफळे करीत आहेत. दि.14 रोजी रात्री 12 च्या सुमारास पवार आणि चव्हाण याचा वाद झाला, परंतु भांडणाचे कारण अघाप समजले नसल्याचे पो काँ. दहिफळे यांनी सांगितले.