Breaking News

कठीण परिस्थितीत कधीच खचू नका - पवार

सध्याच्या काळात बुद्धीवंतांना मोठ्या संधी चालून येतात. त्यासाठी मन लावून आणि प्रामाणिकपणे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशिल रहा. कठीण परिस्थितीत कधीच खचून न जाता, त्यावर मात करून पुढे जायला शिका यश निश्‍चित मिळेल असे प्रतिपादन विजय पवार यांनी केले. ते कै. नानासाहेब विठोबा देशमुख सर्वोदय विदया मंदिर कातळापुर (ता. अकोले) येथे मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यनिकेतन संस्थेचे सचिव टि.एन. कानवडे हे होते. यावेळी महेंद्र पवार, सहसचिव मिलिंद उमराणी, आशा पवार, शाळा समितीचे अध्यक्ष रामजी काठे, उपसरपंच महादू खाडगिर, मुख्याध्यापक के.एल. नवले, हरी पंडीत आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमप्रसंगी विजय पवार यांनी विद्यालयातील 10 गरीब, गरजूवंत विद्यार्थ्यांना दत्तक घेवून त्यांना गणवेश, पुस्तके, वह्या, कंपास, रंगपेटी, परीक्षा फी, सहल खर्च तसेच, महेंद्र पवार यांनी 25 विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वितरण केले. यावेळी विद्यालय परिसरात वृक्षरोपनही करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे सचिव टि.एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, मुख्याध्यापक के.एल. नवले यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पवार यांनी केले. मधुकर मोखरे यांनी सूत्रसंचालन करून गोरक्ष मालुंजकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक के. एल. नवले, मधुकर मोखर, गोरक्ष मालुंजकर, संजय व्यावहारे, अनिल पवार, धनंजय मोहंडूळे आदींनी परीश्रम घेतले.