Breaking News

‘अमृतवाहिनी’च्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच नोकर्‍या!

संगमनेर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्तेचे तांत्रिक शिक्षण देणार्‍या अमृतवाहिनी तंत्रनिकेतनचे अनेक माजी विद्यार्थी देशात व विदेशात यशस्वीपणे कार्यरत आहेत. यावर्षी अंतिम वर्षाच्या परिक्षेपूर्वीच या महाविद्यालयाच्या तब्बल २१५ विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे, अशी माहिती प्राचार्य प्रा. व्ही. बी. धुमाळ यांनी दिली.

सहकार महर्षि स्व. भाऊसाहेब थोरात यांनी सन १९८३ साली अमृतवाहिनी तंत्रनिकेतनची स्थापना केली. संस्थेचे अध्यक्ष माजी महसूल व शिक्षणमंत्री आ. बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्‍वस्त आ. डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या विश्‍वस्त शरयू देशमुख, संस्थेचे विश्‍वस्त अ‍ॅड. आर. बी. सोनवणे, संस्थेचे कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी.धुमाळ आदींनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.