Breaking News

रोनाल्डोचा रियाल माद्रिदला अलविदा

नवी दिल्ली वृत्तसंस्था - फुटबॉलचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने रियाल माद्रिद या क्लबला अलविदा केला आहे. तो आता इटलीच्या युवेंटस संघाकडून नवी इनिंगची सुरवात करणार आहे. रोनाल्डोसाठी युवेंटस क्लबनं ११७ मिलियन डॉलर्स इतकी रक्कम मोजली असल्याची माहिती मिळते आहे. २००९ साली रोनाल्डो रियाल माद्रिद संघात आला होता रोनाल्डोनं गेल्या नऊ वर्षात रियाल माद्रिदसाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.रोनाल्डोनं रियाल माद्रिदकडून खेळताना ४५० गोल झळकावण्याचा विक्रम रचला. तसेच रियाल माद्रिदसाठी त्यानं ४ युएफा चॅम्पियन्स लीग, ३ क्लब वर्ल्ड कप, २ ला लीगा, २ कोपा डेल रे, २ स्पॅनिश सुपर कप आणि २ युएफा सुपर कप जिंकण्याचा पराक्रम गाजवला. गेल्या ९ वर्षात रोनाल्डोनं चारवेळा बॅलन डीओर पुरस्कार जिंकला आहे.