कोहलीने चौथ्या क्रमांकावर खेळावे – गांगुली
मुंबई प्रतिनिधी - इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वन-डे मालिकेसाठी भारताच्या माजी कर्णधार सौरव गांगुलीने “सध्या भारताची फलंदाजी चांगल्याच फॉर्मात आहे, या फलंदाजीला अधिक स्थैर्य देण्यासाठी विराटने वन-डेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी.” असा सल्ला कोहलीला दिला आहे.
भारताने श्रीलंका दौऱ्यापासून आतापर्यंत ६ फलंदाजांना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली आहे. लोकेश राहुल, केदार जाधव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक आणि अजिंक्य रहाणे या फलंदाजांना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली आहे. मात्र गांगुलीच्या मते कोहली हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सध्याच्या घडीला योग्य फलंदाज आहे. “टी-२० क्रिकेटमध्ये लोकेश राहुलने तिसऱ्या तर विराटने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. या मालिकेदरम्यान भारताची फलंदाजी स्थिर दिसत होती. त्यामुळे वन-डे मालिकेतही हा प्रयोग करण्यास हरकत नाहीये असाही गांगुली म्हणाले.

Post Comment