७६ लाखांचा अपहार,आदिवासी लाभार्थ्यांच्या तत्कालीन प्रकल्प अधिकाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल
एकात्मिक प्रकल्प कार्यालयाचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी चंद्रकांत भारमल यांनी २००५ ते २००८ या काळात आदिवासी लाभार्थ्यांच्या कन्यादान योजनेत ७६ लाख २० हजार रूपयांचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदिवासी विकास विभाग नाशिकचे अप्पर आयुक्तांनी यासंदर्भात आदेश दिले होते. . याबाबत अधिक माहिती अशी : भारमल हे सन २००३ ते २००८ या कालावधीत राजूर आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प कार्यालयात प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. यादरम्यान सन २००५ ते २००८ या कालावधीत आदिवासींसाठी कन्यादान योजना सुरू होती. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी मणीमंगळसूत्र, संसारोपयोगी भांड्यांचे संच वाटप करण्याची जबाबदारी भारमल यांना दिली होती. भारमल यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी या कालावधीतील एकूण ७६ लाख २० हजार रुपयांचे मणीमंगळसूत्र व संसारोपयोगी भांड्यांच्या संचाची बेकायदेशीररित्या विल्हेवाट लावत शासकीय रकमेचा अपहार करून शासनाची फसवणूक केली.