दूध व्यवसायात निकोप स्पर्धेची गरज : विखे
लोणी : प्रतिनिधी
गेल्या काही वर्षात राज्यात सहकारी आणि खाजगी दूध संस्थांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. मात्र ही स्पर्धा जीवघेणी नसली पाहिजे तर निकोप असावी, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केले. लोणी बुद्रुक येथे हसनापूर रोडलगत असलेल्या प्रभात डेअरीच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. माजी उपसरपंच अण्णासाहेब म्हस्के व त्यांचे सुपुत्र डॉ. प्रकाश यांच्यासह प्रभातचे अध्यक्ष सारंगधर निर्मळ, उपाध्यक्ष राजेश लेले, सहाय्यक महाव्यवस्थापक कल्पेश तक्ते, माजी सरपंच काशिनाथ विखे, ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, विखे कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, उपसरपंच अनिल विखे, प्रवरा बँकेचे माजी संचालक किसनराव विखे, सिनेट सदस्य अनिल विखे, माजी उपसभापती सुभाष विखे, तंटामुक्तीचे अध्यक्ष संपतराव विखे, भगवंतराव विखे, मुरलीधर विखे, वसंतराव विखे, विकास संस्थेचे अध्यक्ष चांगदेव विखे, साहेबराव दळे, संपतराव म्हस्के, देवीदास म्हस्के, नाना म्हस्के, उद्योजक संजय धावणे, माजी उपसरपंच अशोक धावणे आदी उपस्थित होते.