Breaking News

अर्चना अंत्रे यांना पीएच. डी. प्रदान

सात्रळ प्रतिनिधी

राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील अर्चना अंत्रे यांना नुकतीच अर्थशास्त्र विषयातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी.प्रदान करण्यात आली. अंत्रे यांनी ‘अहमदनगर जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे उत्पादन विपणनाचे अर्थशास्त्र’ या विषयावर प्रबंध सादर केला.

यासाठी त्यांना डॉ. डी. जी. उशीर, डॉ. एस. के. पगार. डॉ. आर. जी. रसाळ, प्रा. जयश्री सिनगर, प्रदिप मोहळे, सागर मोहळे व वडील गोधा अंत्रे यांचे मार्गदर्शन लाभले. हवामानातील बदलामुळे पावसाचे प्रमाण कमी जास्त झाले आहे. त्याचा फटका नगर जिल्ह्यातील ऊस पिकणाऱ्या शेतीला बसू लागल्याने शेतकरी पर्यायी पिकाच्या शोधात होते. सोयाबीन पिकाच्या रूपाने शेतकऱ्यांना कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारा पर्याय उपलब्ध झाला आहे. सोयाबीनची लागवड ते विपणन यात शेतकरी कसा कमी पडतो, यासह अनेक गृहिते या पिकावर संशोधन करून त्यांनी सिद्ध केले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरतील, असा विश्वास डॉ. अर्चना अंत्रे यांनी व्यक्त केला. डॉ. अंत्रे या पत्रकार विकास अंत्रे यांच्या भगिनी आहेत. पीएचडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.