Breaking News

निमगांव जाळी आणि खांबे येथे मोफत गॅस वाटप


संगमनेर प्रतिनिधी

तालुक्यात माजीमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने गोर - गरिबांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. माजीमंत्री आ. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निमगांव जाळी दारिद्र्यरेषेखालील येणार्‍या गोरगरीब, दीनदुबळ्या महिलांना प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅसचे वाटप करण्यात आले. 

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांच्या हस्ते पार पडलेल्या या कार्यक्रमात दुबार रेशन कार्ड वितरण करण्यात आले.

गॅस वितरणप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, गणपत सांगळे, प्रतिभा जोंधळे, सोमनाथ जोंधळे, विजय हिंगे, रंगनाथ वदक, उपसरपंच अनिल डेंगळे, ताराचंद अरगडे, डॉ. सुरेश जोंधळे, टि. पी. जोंधळे, सोमनाथ खरात, माऊली डेंगळे, निलेश तांबे, भैय्यासाहेब जोंधळे, मोहन वदक, परशुराम जोंधळे, अशोक डेंगळे, रामभाऊ जोरी, रघुनाथ दातीर, माधव दातीर, तुकाराम दातीर, आनंदा दातीर, किसन मुठे, गजानन भोईर, विलास दातीर, जनसेवक संजय वर्पे, संजय केदार आदिंसह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी ३६ लाभार्थ्यांना गॅसचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नवनाथ अरगडे, गणपतराव सांगळे यांची भाषणे झाली.