घोटण येथे दूध दर वाढीसाठी देवाला साकडे
शेवगाव / प्रतिनिधी
तालुक्यातील घोटन येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुनेश्वर देवाला दुग्धाभिषेक घालून दूध दर वाढीसाठी साकडे घालण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपासाठी पाठिंबादेखील देण्यात आला शेतकरी संघटनेचा दूध दर पाच रुपये लिटरप्रमाणे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम वर्ग करण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
जोपर्यंत सरकार या सर्व मागण्या मान्य करणार नाहीत, तोपर्यंत आंदोलनाला पूर्ण पाठिंबा राहील, असे घोटण येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ठरवले आहे. यावेळी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे संदीप मोटकर, केशव कातकडे, शिवाजी मोटकर, दिलीप कचरे, नामदेव ढाकणे, दादासाहेब गायकवाड, बाळासाहेब क्षिरसागर, वैभव कुंभार, अमोल क्षिरसागर, शरद घनवट, नितीन घाडगे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.