शाळांच्या प्रवेशद्वारवर व्यसनमुक्तीचे फलक लागणार
सुपा प्रतिनिधी
पारनेर तालुक्यात सर्व शाळांमध्ये व्यसनमुक्ती जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत धुम्रपानविरोधी जनजागृतीचे फलक शाळेच्या गेटसमोर, आवारात लावून व्यसनविरोधी जनजागृती करण्यात यावी, यासाठी शाळांच्या प्रवेशद्वारावर व्यसनमुक्तीचे फलक लागणार, अशी माहिती व्यसनमुक्ती चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी दिली. यावेळी व्यसनमुक्ती चळवळीचे प्रणेते शरद पवळे, परिवर्तन फाऊंडेशनचे सचिन भालेकर, पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, भाऊसाहेब खेडेकर, मानवाधिकारचे सुहास शेळके, वाडेगव्हाण ग्रामरक्षक दलाचे अध्यक्ष अशोक शेळके, भूमिपूत्र जिल्हा संघटक सचिन शेळके, मानवाधिकारचे तालुकाध्यक्ष अविनाश ढोरमले, प्रविण औटी, जिल्हा योग प्रचारक खंडू आर्य, माहिती सेवा समितीचे तालुकाध्यक्ष शरद रसाळ, जनसंपर्क अधिकारी डॉ. गुलाब शेख, शशिकांत भालेकर, भगवान गायकवाड, सुदर्शन सरडे, राजेंद्र सरडे आदींसह व्यसनमुक्ती चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.