आध्यात्मिक विभूति पुरस्कार घोषित
नगर
अमेरिकेतील मानवतेचा बहुपक्षीय तसेच विश्वस्तरीय विकास साधण्यासाठी समर्पित संस्था ‘वुई केअर फॉर हयुमॅनिटी’ च्या वतीने निरंकारी सद्गुरु माता सविन्दर हरदेव जी महाराज यांना सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक विभूति पुरस्कार 2018 ने सम्मानित करण्याची घोषणा नुकतीच करण्यात आल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख किशोर खुबचंदानी यांनी दिली. संस्था मानवाधिकार, विश्वशांती, प्रदूषणरहित वातावरण, शिक्षण, आरोग्य, दारिद्रय निर्मूलन तसेच सशक्तिकरण यांसारख्या प्रयत्नांना प्रोत्साहन देत असून दरवर्षी विश्वातील सर्वश्रेष्ठ विभूतींना त्यांच्या विभिन्न क्षेत्रातील महान योगदानांसाठी सन्मानित करते.