Breaking News

नव्या माध्यमांची तत्त्वे समाज व माध्यमांनी ठरवावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



नागपूर 
नवीन समाज माध्यमांसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करताना समाज विघातक विचार समाजात पोहोचणार नाहीत, याची दक्षता समाज व माध्यमांनी घेण्याची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

प्रेस क्लबच्या सभागृहात माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, नागपूर श्रमिक पत्रकार संघ, नागपूर प्रेस क्लब आणि प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त वतीने ‘फेक न्यूज: परिणाम आणि दक्षता’ या विषयावर पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर, नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, सचिव ब्रम्हाशंकर त्रिपाठी, प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. विवेक नानोटी, पत्रकार राहुल पांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.