Breaking News

डाऊच खुर्दमध्ये पात्र लाभार्थ्यांना गॅस वाटप


कोपरगाव शहर प्रतिनिधी :

पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या हस्ते मोफत गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. डाऊच खुर्दचे सरपंच संजय गुरसळ, कोपरगाव गॅस कंपनी व्यवस्थापक लक्ष्मण निमसे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते.

तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायत व कोपरगाव गॅस कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला. केंद्र सरकारच्या या स्तुत्य उपक्रमातून त्याचा जास्तीत जास्त लाभार्थीनी लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक जाधव यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सलिम कादर शेख, दिगंबर पवार, स्वाती रणधीर, प्रमिला गुरसळ, मनु पवार, सूर्यकांत जाधव, शंकर गुरसळ, वंदना पीठे, गायकवाड जीएम, शाम चौधरी, चंदू पवार, मच्छिंद्र ठोंबरे आदींनी कार्यक्रम पार पाडण्यास विशेष परिश्रम घेतले. ग्रामपंचायत सदस्य दिवेकर पवार यांनी आभार मानले.