Breaking News

शशी थरूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

नवी दिल्ली : काँग्रेस नेते शशी थरूर यांना पटियाला न्यायालयाने अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे. एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर के ला. तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय थरूर यांना परदेशात जाता येणार नाही आणि उपलब्ध पुराव्यांशी छेडछाड करता येणार नसल्याचे स्पष्ट निर्देश दिले. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी थरूर यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. थरूर यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. थरुर यांना भीती होती की 7 जुलैला या प्रकरणात होणार्‍या सुनावणीमध्ये त्यांना अटक करण्याचे न्यायालय आदेश देऊ शकते. यामुळे त्यांनी मंगळवारी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र दिल्ली पोलिसांनी थरुर यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केला आहे. आता या जामीन अर्जावर न्यायालय आज निर्णय देणार आहे. जानेवारी 2014 मध्ये दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सुनंदा पुष्कर मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मृत्यूची चौकशी करण्यास दिल्ली पोलिसांनी सुरुवात केली होती. थरूर यांच्यावर पत्नीचा छळ करणे तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.