Breaking News

साईंच्या दरबारात नजरबंदीचा खेळःभाग 3 हातात पाच मेगा पिक्सल कमेरा हँडसेट, मग शिर्डीत दोन मेगा पिक्सलचा आग्रह का?


नाशिक/ कुमार कडलग
आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर करण्यासाठी सर्वदूर धडपड सुरू असतांना शिर्डीत मात्र पाच वर्षापुर्वीच्या तंत्रज्ञानावर आधारीत 2 मेगा पिक्सल सीसीटीव्ही कमेरे लावण्याचा सल्ला देणार्‍या पिडब्लूसी कंपनीसह या कंपनीला चाल देणार्‍या प्रशासनाबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
आपल्या सभोवताली नित्य वापरात असलेल्या मोबाईलच्या वापराबाबत आपण प्रत्येक अतिदक्ष असतो. हाय डिफिनेशन (कऊ) तंत्रज्ञान असलेल्या कंपनीचे हँडसेट वापरण्याकडे समाजाचा कल आहे. विशेषतः हँडसेटचे फ्रंट आणि बॅक हे दोन्ही कॅमेरे अधिक क्षमतेचे म्हणजे पाच पिक्सलचे असावेत, असा आग्रह असतो.व्यक्तिगत पातळीवर हाताळण्यासाठी मर्यादीत वापर असतांना दोन मेगा पिक्सल कॅमेरा असलेल्या हँडसेटला शक्यतो पसंदी दिली जात नाही. व्यक्तीगत पातळीवर एवढी दक्षता घेतली जात असेल तर एखाद्या सार्वजनिक वर्दळीच्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवायचे असतील तर किती खबरदारी घ्यायला हवी.
आपल्या हातात अत्याधुनिक हाय डिफिनेशन पाच मेगा पिक्सल कॅमेरा हँडसेट असेल तर शिर्डीसारख्या रोज हजारो भाविकांच्या सुरक्षेवर नजर ठेवण्यासाठी केवळ 2 मेगा पिक्सल, तोही 2013 चा वापरलेला किंवा चालू स्थितीत असलेला सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचा सल्ला किती व्यवहारीक ठरू शकतो? असा सल्ला देणारी स ल्लागार कंपनीची बौध्दीक कुवत काय असू शकते? या कंपनीला खर्‍या अर्थाने तांत्रिक ज्ञान आणि बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास आहे का? प्रशासनाचा गाडा हाकणारे विद्वान या मुलभूत बाबींचा विचार का करीत नाहीत? शिर्डीचा क्षेत्रीय परिसर, भाविक संख्येची घनता या बाबींचा विचार करून दिलेला सल्ला व्यवहारीक नसतांना पिडब्लूसीला खांद्यावर बसवून फाजील लाड का पुरवले जात आहेत? यासारखे नाना प्रश्‍न उपस्थित झाले आहेत.
तीन दिवसापासून लोकमंथनने या विषयाला वाचा फोडल्यानंतर आर्थिक काटकसर करण्यासाठी 2 मेगा पिक्सल आणि जुने तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला दिला गेला अशी मल्लीनाथी करणारी प्रतिक्रिया एका प्रशासकीय अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर लोकमंथनला दिली आहे, ही प्रतिक्रिया देखील सारवासारव करणारी असून उपलब्ध अत्याधुनिक वापरून कमी देखभाल खर्चात 5 मेगा फिक्सल 2के किंवा 4के तंत्रज्ञान वापरता येऊ शकते, यावर प्रकाशझोत टाकून लोकमंथन पिडब्लूसी आणि प्रशासनात असलेले संगनमत चव्हाट्यावर आणणार आहे.