Breaking News

विविध योजनेच्या माध्यमातून गावकर्‍यांची सेवा व्हावी-गुरुवर्य भास्करगिरी महाराज



नेवासा (प्रतिनिधी)  
नेवासा तालुक्यातील आदर्शगाव सुरेशनगर येथे राष्ट्रीय पेय जलयोजनेतून सुमारे 40 लाख रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना भास्करगिरी महाराज म्हणाले की सरपंच पांडुरंग उभेदळ यांनी आदर्शगाव सुरेशनगरच्या माध्यमातून अनेक योजना राबवून जनतेची चांगली सेवा करून गावाला सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. विविध योजना व सुविधा उपलब्ध करून देऊन गावाची व गावकर्‍यांची सेवा झाली पाहिजे असे प्रतिपादन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलताना केले. यानंतर लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या अंगणवाडीच्या डिजिटल वर्गाचे उदघाटन ही भास्करगिरी महाराजांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ग्रामसेवक गणेश दुधाळे यांनी पेयजल योजनेची माहिती दिली. सरपंच पांडुरंग उभेदळ व उपसरपंच अनिता उभेदळ यांनी स्वागत करून राष्ट्रपती पुरस्कार विजेते सुरेशनगर मध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली. सुरेशनगर येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सुरेश उभेदळ, हंडीनिमगावचे सरपंच आण्णासाहेब जावळे, माजी सरपंच भिवाजी आघाव, पंचायत समिती सदस्य किशोर जोजार, ज्ञानेश्‍वरचे संचालक जनार्दन पटारे, होमगार्ड समादेशक पत्रकार बाळासाहेब देवखिळे, कल्याणराव उभेदळ, भागचंद पाडळे, अण्णाभाऊ क्षीरसागर, नाथा बाबर, साहेबा सावंत, सुरेखाताई उभेदळ, मनीषा विधाटे, चंदाताई रसाळ, अल्बम अभिनेत्री मोनाली विधाटे,शिवाजीराव जाधव, दिलीप शेटे, अशोक घाडगे, मीरा जाधव यांच्यासह महिला व पुरुष भाविक मोठया संख्येने उपस्थित होते . शिक्षक डॉ. रेवणनाथ पवार यांनी सूत्रसंचालन केले तर सरपंच पांडुरंग उभेदळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.


शिक्षक व अधिकार्‍यांचा गौरव
या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कक्ष अधिकारी त्रिंबकराव गायकवाड हे 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवासनिवृत्त झाल्याबद्दल तसेच येथील शिक्षक बाबासाहेब तोरडमल व दिनकर बानकर यांची इतरत्र बदली झाल्याबद्दल त्यांचा कार्याचा गौरव गुरुवर्य भास्कगिरी बाबांच्या हस्ते करण्यात आला.