Breaking News

गफ्फार पठाण यांचा सत्कार

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे नाथपंथिय समाजातील पाच जणांची येथील लोकांनी लहान मुलांना पळविणारे समजून, त्यांना अमानुष मारहाण केली. त्यात त्या पाच जणांचा मुत्यू झाला. दरम्यान दि. 1 जुलै रोजी पाटोदा (गरडाचे) ता. जामखेड येथे रात्री 10 वा. चे सुमारास बस स्टॅण्डजवळ एक अज्ञात व्यक्ती आला त्यावेळी गावातील नागरिक जमा झाले. त्यास मारहाण होण्याअगोदर पाटोदा गावचे उपसरपंच गफ्फार पठाण हे आले, व त्यास मारहाण होवू न देता, जामखेड पोलीस स्टेशनला कळविले. त्यावेळी तात्काळ पोलीस स्टाफ सदर ठिकाणी येवून अनोळखी व्यक्तीस ताब्यात घेतले. चौकशी केली असता तो व्यक्ती चौंडी, ता. जामखेड येथील होता. त्यास त्याचे नातेवाईकांचे ताब्यात दिलेले आहे. याकामी सहकार्य करणारे पाटोदा गावचे उपसरपंच गफ्फार पठाण व युवकांचा सत्कार करण्यात आला. पो. नि. पांडुरंग पवार यांनी आवाहन केले आहे की, कोणीही मुलं चोरणारी टोळी आली असल्याची किंवा इतर अफवा व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुकवर, मौखिक चर्चेतून पसरवू नये. कोणास काही संशय आल्यास पोलीसांशी संपर्क साधावा. संबंधित व्यक्तीस पकडुन त्यास कसलीही इजा न करता, पोलीसांच्या ताब्यात द्यावे. कोणीही हातात कायदा घेवू नये.