Breaking News

ससून रूग्णालयात अखेर मेस्मा लागू


पुणे : परिचारिकांच्या बदल्यावरून आज अखेर रूग्णालयाकडून मेस्माचा निर्णय देण्यात आला. त्यामुळे पुण्यातील ससून रूग्णालयात मेस्मा लागू झाला आहे. अशा प्रक ारे मेस्मा लागू लेले ससून हे पहिले रूग्णालय आहे. या कायद्यामुळे आता रूग्णालयातील कर्मचा-यांना पुढील सहा महिने अत्यावश्यक सेवा बंद ठेवता येणार नाही. क ाही दिवसापूर्वी येथील परिचारकांकडून अन्यायकारक बदलीच्या विरोधात संप पुकारण्यात आला होता. आता त्या संपाच्या पार्श्‍वभूमीवर हा कायदा लागू करण्यात आला आहे. या याचिकेवर 3 जुलै रोजी सुनावणी होवून न्यायालयाने राज्य सरकारला डॉक्टरांप्रमाणेच परिचारिकांनाही महाराष्ट्रा अत्यावश्यक सेवा परिक्षण कायदा 2011, क लम 4(1) मेस्मा लागू करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे आदेश दिले . या संपाविरोधात काही रूग्णांच्या नातेवाईकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने रूग्णालयाच्या 500 मीटरच्या आत आंदोलन करण्यास मनाई केली हेाती, आता अखेर ससूनमध्ये मेस्मा लागू करण्यात आला आहे.