Breaking News

नगराध्यक्ष तनपुरेंवर मोर्चात जहरी टीका


राहुरी प्रतिनिधी,
आमदारकीचे डोहाळे लागलेले राहुरी नगरपरिषदचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपूरे यांनी शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्याच्या नावाखाली आपली राजकीय ताकद वाढविण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले. शेतकरी व महसूल प्रशासनाला वेठीस धरण्याचे काम केले आहे, अशी टीका आज [दि. ९ ] काढण्यात आलेल्या मोर्चात करण्यात आली.

यावेळी एका कार्यकर्त्याने म्हटले, डिसेंबर २०१६ मध्ये राहुरी नगरपरिषद निवडणूक लढवितांना प्राजक्त तनपूरे यांनी शहरवासीयांना स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखविले. मात्र शहरात विकास करण्यात त्यांना अपयश आल्याचे दिसते. शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न, अतिक्रमणचा प्रश्न, अस्वच्छतेचा प्रश्न कायम असतांना आमदारकीचे डोहाळे लागलेले प्राजक्त तनपूरे राहुरी पाथर्डी मतदार संघात दौेरे करण्यात मग्न आहेत. गेल्या दहा वर्षापासून तनपूरे घराण्याला आमदारकी पासून वंचित ठेवणारे शिवाजीराजे गाडे हे आज प्राजक्त तनपूरे यांच्या सोबत फिरताना दिसत आहेत. आज [दि.९] सकाळी शहरातील बाजार समितीच्या आवारातून मोर्चाला सुरुवात झाली. करुन राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला होता. यावेळी एका कार्यकर्त्यांने मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि, प्राजक्त तनपूरे व शिवाजीराजे गाडे यांची राम लक्ष्मणाची जोडी अाहे. गेल्या विधान सभेत परस्परांचे धिंडवडे काढणारे शिवाजीराजे गाडे व प्राजक्त तनपूरे हे कधी राम लक्ष्मण झाले व कशासाठी झाले. याची चर्चा नागरीकांमध्ये सुरु होती. 

राहुरी तालूक्यातील बोंडअळी अनुदान मिळावे, दुधाला योग्य भाव मिळावा तसेच विजेच्या लपंडावा बाबत काढण्यात आलेल्या या मोर्चात राष्ट्रवादीचे संग्राम कोते यांनी शेतकर्तांचे प्रश्न न मांडता प्राजक्त तनपूरे यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी जनतेला गळ घातली. या मोर्चात शेतकरी कमी व राष्ट्रवादीचे कार्यकर्त्ये जास्त प्रमाणात सहभागी होते. सदर मोर्चा हा शेतकर्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी होता की, राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी होता, असा प्रश्न नागरिकांना पडला. मागील विधानसभेत शिवसेनेचा भगवा गमछा गळ्यात घालून शिवसेनेचा प्रचार करणारे प्राजक्त तनपूरे आज राष्ट्रवादीचा गमछा घालताना दिसल्याने ते नेमके कोणत्या पक्षात आहेत, असा प्रश्न नागरिकांमधून व्यक्त होत आहे.