Breaking News

‘अमृतवाहिनी’च्या गुणवत्तेत मागील वर्षीपेक्षा वाढ : प्राचार्य डॉ़. व्यंकटेश यांची माहिती


संगमनेर प्रतिनिधी 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या अभियांत्रिकी शाखांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत़. त्यामध्ये येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा सरासरी निकाल ९५ टक्के लागला. मागील वर्षापेक्षाही यावर्षी विद्यार्थ्यांच्या सरासरी गुणवत्तेत वाढ झाली, अशी अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ एम़ ए़ व्यंकटेश यांनी दिली़. 

सर्व शाखांमधून महाविद्यालयीन स्तरावर ई.अ‍ॅण्ड टी.सी. विभागातील प्रणिता गेटम ही विद्यार्थिनी ८६. ४६ टक्के गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम आली. ती विद्यापीठातही टॉपटेनमध्ये आली. इलेक्ट्रॉनिक्स विभागातील प्रियंका मालुंजकर आणि सिव्हील विभागातील सपना वाघ या विद्यार्थीनींनी प्रत्येकी ८४. ७३ टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या़. मेकॅनिकल विभागातील स्वाती वाकचौरे ही ८३. ४० टक्के गुण मिळवून महाविद्यालयात तृतीय आली. 

या सर्वोत्कृष्ट निकालाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा़जी आ. बाळासाहेब थोरात, विश्‍वस्त आ. डॉ़. सुधीर तांबे, शरयु देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़. एम़. ए़. व्यंकटेश, उपप्राचार्य प्रा़. ए. के. मिश्रा, रजिस्ट्रार प्रा़. व्ही़. पी़. वाघे आदींसह सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्याचे अभिनंदन केले़.