Breaking News

सुदर्शन विद्यालय परिसरात वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण


नेवासा / प्रतिनिधी 

तालुक्यातील मक्तापुर-पिचडगाव रोडवर असलेल्या सुदर्शन विद्यालय परिसरात संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने वृक्षदिंडी दिंडी काढून वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षलागवड मोहिमेला राष्ट्रीय कर्तव्य म्हणून चळवळ बनवा असे आवाहन यावेळी संघर्ष मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सुदर्शन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हातात झाडांची रोपे घेऊन झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश वृक्षदिंडीद्वारे
दिला. यावेळी विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मक्तापुरचे बनेमीन साळवे हे होते. सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब काळे, सुदर्शन इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक दत्तात्रय कोळेकर, संघर्ष मित्र मंडळाचे मार्गदर्शक पंचायत समिती सदस्य रावसाहेब कांगुणे, संघर्ष मित्र मंडळाचे सदस्य नाथा पंडित, अनिल पाटील, इंजि. अंबादास लोंढे, बिरबल दरवडे, नवनाथ साळुंके, संभाजी विधाटे, कावेरी खर्डे, नवनाथ साळुंके, आसाराम नर्‍हे, प्रसाद सुकाळकर, ग्रामसेवक वाघ यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे पंचायत समितीचे सदस्य रावसाहेब कांगुणे यांनी स्वागत केले. नाथा पंडित यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्ष लागवडचे फायदे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी वृक्षारोपणाचे महत्व व्यक्त केले. यावेळी विद्यालयाचे शिक्षक शकुर ईनामदार, हनुमंत वाकचौरे, कैलास कर्जुले, दत्तात्रय कुळधरण, गणेश कचरे, शिवाजी बर्डे, संभाजी सातपुते, दिवाकर साळवे, भाकचंद साळवे यांच्यासह पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नाथापंडित यांनी सूत्रसंचालन केले तर, प्रसाद सुकाळकर यांनी आभार मानले.