Breaking News

सुपा येथे दिंडीचे जोरदार स्वागत


सुपा / प्रतिनिधी 
पारनेर तालुक्यातील सुपा येथे माजी सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय पवार व सफलता उद्योग समुहाचे संचालक सचिन पवार यांनी दिंडी रथास हार घालून स्वागत केले. सुप्याचे सरपंच भाऊसाहेब पवार यांच्यावतीने दत्ता पवार व अंकुर हॉस्पीटलचे डॉ. अतुल हंडोरे यांनी वारकर्‍यांसाठी औषधे दिली. यावेळी वारकर्‍यांना शुभेच्छा देतांना माजी सरपंच विजय पवार, सचिन पवार, दत्ता पवार व शहाजापूरच्या सरपंच सुनिता पवार यांनी पंढरपुर येथील मुक्कामस्थळी प्रत्येकी दोन-दोन शौचालये बांधून देण्याचे आश्‍वासन दिले. पायी दिंडीप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी हभप रावसाहेब गवळी, संजय शिंदे, बबन गवळी, विठ्ठल पवार, सुरेंद्र शिंदे, खंडू मोटे, रावसाहेब जरे, संपत पवार, बाळासाहेब पवार, सुखदेव म्हस्के, अण्णा मोटे, संदीप पवार, मालदार चोपदार उत्तम सकट, साळवे यांच्यासह वारकरी पुरुष व महिल्या वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हभप प्रमोद महाराज गवळी यांनी उपस्थितांचे आभार मानले. गाव प्रदक्षणा घालून दिंडी पुढील मार्गास मार्गस्थ झाली.