Breaking News

कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचे चापडगावात स्वागत

मिरजगाव / प्रतिनिधी
मिरजगाव येथील सद्गुरु कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचे चापडगांव ता. कर्जत येथे स्वागत करण्यात आले.
संत गजानन प्रतिष्ठान संचलित सदगुरु कृषी महाविद्यालय व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमांतर्गत चापडगाव ता. कर्जत येथे अगमन झाले असता, कृषी कन्या स्नेहल गोडसे, अनिता माळगावे, प्रियंका घावटे, रुपाली पराडे, भाग्यश्री धोंगडे, गौरी जगताप यांचे चापडगांवच्या सरपंच निलीमा घनवट, उपसरपंच मच्छिंद्र रसाळ, माजी सरपंच आप्पासाहेब घनवट, माजी उपसरपंच प्रकाश शिंदे, रणजित घनवट, विश्‍वास शिंदे, नानासाहेब शिंदे, किशोर भांडवलकर, सुभाष लांडगे आदींनी कृषी कन्यांचे स्वागत केले.
या कृषी कन्या चापडगाव येथील शेतकर्‍यांना शेतीविषयक आधुनिक पध्दतीचा वापर कसा करावा, त्याचप्रमाणे बिज प्रक्रिया करण्यासाठी काय करावे, खतांचा वापर, खत व्यावस्थापन यांचे शेतकर्‍यांना प्रात्यक्षिकासह माहिती देणार असल्याचे कृषी कन्यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी कृषी कन्यांना प्राचार्य डॉ. रामदास बिटे, कृषी कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रुतिका पाटील, प्रा. पुजा इनामके, प्रा. मधुबाला गोरे यांचे मार्गदर्शन लाभले.