Breaking News

मच्छीमार सहकारी संस्थांना 4 कोटींचा तोटा

पालघर, दि. 27, ऑक्टोबर - पालघर जिल्ह्यातील सातपाटीमधील दोन्ही सहकारी संस्थेमार्फत व्यापा-यांनी खरेदी केलेल्या पापलेटच्या प्रतिकिलो दरात सुमारे दीडशे ते एकशे  पंच्याहत्तर रुपयांची घट केल्याने दोन्ही संस्थेला अडीच महिन्यात सुमारे 4 कोटी 66 लाख 85 हजार 398 रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. डॉलरची घसरण आणि  बाजारपेठेतील मंदीची कारणे व्यापारी देत असल्याने त्यावर इलाज म्हणून सर्व मच्छीमार संस्थांनी मासे निर्यात आणि विक्री करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.
राज्यातील किनारपट्टीवरील बंदरात होणा-या मासेमारी पैकी सातपाटी गावातील मासेमारी नौकांनी आणलेला पापलेट हा चवीत रुचकर असल्याने खवय्यासह निर्यात करणारे व्यापारी  इथल्या पापलेटला प्राधान्य देतात. परंपरागत ‘गिल नेट’ पद्धतीच्या जाळ्यातून प्रवाहाने वाहत जाणारे मासे पकडून एका विशिष्ट पद्धतीने बनविलेल्या पेटीतील बर्फात साठवून ठेवले  जात असल्याने त्याची चव अनेक दिवस टिकून राहते. त्यामुळे इथल्या मच्छीला मोठी मागणी असते.
प्रत्येक वर्षी पापलेटच्या भावात वाढ करूनच भाव घोषित करण्याची पद्धत आहे. यावर्षी ही मागच्या वर्षी असलेल्या सुपर क्वालिटीचा पापलेट प्रति किलो 1350 रु, एक नंबरला  1140 रु, दोन नंबरला 850 रु, तीन नंबरला 625 रु , चार नंबरला 416 रुपये या पेक्षा अधिक भाव मिळेल या आशेवर सर्व मच्छीमार व त्यांच्या संस्था होत्या. मात्र यावर्षी  2016 मध्ये पापलेटला गेल्या वर्षी असलेल्या दरापेक्षा व्यापा-यांनी अचानक प्रति किलो शंभर ते एकशे पंच्याहत्तर रु पये एवढा भाव उतरविल्याने सहकारी संस्था प्रचंड धास्तावल्या  होत्या. संस्थांच्या संचालकांनी व्यापा-यांना निदान गेल्या वर्षीचा भाव तरी द्यावा अशी गळ घातली. परंतु डॉलरचे उतरलेले भाव आणि जागतिक बाजार पेठेत आलेली मंदी इ. ची क ारणे देत व्यापारी आपल्या मतावर ठाम राहिले होते.
सातपाटी सर्वोदय मच्छीमार सहकारी संस्थेच्या माध्यमातून 15 ऑगस्टला सुरू होणा-या मासेमारी कालावधी पासून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुपर प्रतीचा पापलेट 5 हजार 469  किलो, एक नंबर प्रतीचा 22 हजार 216.2 किलो, दोन नंबरचा 69 हजार किलो, तीन नंबर 91 हजार 13.3 किलो, तर चार नंबरचा पापलेट 22 हजार 635.3 किलो असा एकू ण 2 लाख 10 हजार 333.7 किलो पापलेट व्यापारानी खरेदी केला. मागच्या वर्षीच्या दराने या सर्व मच्छींची एकत्रित किंमत 15 कोटी 76 लाख 59 हजार 130 रु पये एवढी  झाली असती मात्र यावर्षी दरात व्यापा-यांनी घट केल्याने संस्थेला फक्त 13 कोटी 48 लाख 71 हजार 620 रु पये मिळाल्याने संस्थेला निव्वळ 2 कोटी 27 लाख 87 हजार  510 रु पयांचा तोटा सहन करावा लागल्याचे संस्थेचे अध्यक्ष रवींद्र म्हात्रे यांनी सांगितले.