Breaking News

विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून, जतन करावे : वाकचौरे


मेहेंदुरी / प्रतिनिधी
राज्य शासनाने जुलै महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात 13 हजार कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेनुसार अकोले तालुक्यातील मेहेंदुरी गावानेही यात सहभाग घेतला असून, संपूर्ण तयारी करून 1100 झाडे लावण्याचा संकल्प ठेवून गावात वृक्षारोपन वनसंवर्धन दिन सप्ताहास सुरवात करण्यात आली. यावेळी जि.प. सदस्य जालिंदर वाकचौरे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वाकचौरे यांनी ग्रामस्थांना व विद्यार्थ्यांना वृक्ष रोपणाचे फायदे सांगून मार्गदर्शन केले. ग्लोबल वार्मिंगच्या धोक्यापासून वाचायचे असेल तर, वृक्षारोपण काळाची गरज आहे. वृक्षारोपण पर्यावरणाला पूरक असून, वृक्ष रोपणाची मोहीम गेल्या 3 वर्षापासून अधिक प्रमाणात राबवली जात आहे. झाडे लावा व झाडे जगवा असा संदेश देवून विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी वृक्षारोपण करून न थांबता झाडांचे जतण करा हे सांगून मार्गदर्शन केले. या वेळी वनपाल एल.पी. शेंडगे यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. महाराष्ट्र शासनाचे 2019 पर्यंत 50 कोटी झाडे लावण्याचे ध्येय असून, मानवाने निसर्गाचा र्‍हास केलेला आहे, मात्र त्याचे संगोपनदेखील माणसानेच केले पाहिजे, झाडे लावायची चळवळ चालू ठेवावी. प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांकडून शाळेने बी गोळा करून आम्हाला द्यावे आम्ही त्याची रोपे आपणास देऊ असे सूचित केले. या कार्यक्रमासाठी जि. प. सदस्य जालिंदर वाकचौरे, वनपाल एल. पी. शेंडगे शिक्षणविस्तार अधिकारी कलिंदिनी हासे ग्रामसेविका अनुराधा शेलार सरपंच रुपाली संगारे ग्रा.पं. सदस्य डॉ. अविनाश कानवडे, डॉ. हासे, मुख्याध्यापक विलास सावंत, सेक्रेटरी मधुकर आरोटे, अर्जून संगारे, विकास बंगाळ, अंगणवाडी सेविका मंदाकिनी फरगडे, विद्यालयाचे सर्व शिक्षक व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक विकास बंगाळ यांनी केले, तर आभार पापळ यांनी मानले.

वृक्षारोपण तात्पुरते न राहता वृक्षारोपण झाल्यावर त्याची निगा देखभाल झाली पाहिजे, झाडांचे जतन झाले तर, खर्‍या अर्थाने वृक्षारोपण झाले असा त्याचा अर्थ होईल. वृक्षारोपणाने चांगले वातावरणात तयार होवून आपले स्वास्थ आणखी सुधारेल.
गटनेते जिल्हा परिषद
जालिंदर वाकचौरे

मानवाने निसर्गाचा र्‍हास केलेला आहे, मात्र त्याचे संगोपनदेखील माणसानेच केले पाहिजे, झाडे लावायची चळवळ चालू ठेवावी व प्रत्येक वर्षी विद्यार्थ्यांकडून बी गोळा करून आम्हाला द्या आम्ही त्याची झाडे आपणास देऊ व निसर्गाचे संवर्धन करू.