महाबळेश्वर तालुक्यात कोयना पुनर्वसितांच्या विकासासाठी 15 कोटी 65 लाखाचा निधी
सातारा, दि. 6 (प्रतिनिधी) : महाबळेश्वर तालुक्यातील कोयना प्रकल्प टप्पा 1 व 2 अंतर्गत दरे, पिंपरी, आकल्पे, निवळी, लामज ही गावे कोयना धरण बुडीत क्षेत्रात असल्याने या कोयना पुनर्वसित गावठाणांना प्रमुख जिल्हा मार्गांशी जोडणार्या इतर जिल्हा मार्ग 26 या रस्त्यावर डांबरीकरण तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी मोरीची बांधकामे करणे या नागरी सुविधांसाठी 15 कोटी 65 लाख 16 हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याची माहिती आ. मकरंद पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, कोयना बुडीत क्षेत्रातील पुनर्वसित गावातील जनतेला अपुर्या सोयीसुविधा तसेच दळणवळणाची कोणतीही सुविधा नसल्याने प्रकल्पग्रस्तांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागते. तसेच विकासकामांपासून हे लोक वंचित आहेत. दरे, पिंपरी, आकल्पे, निवळी, लामज या कांदाटी खोर्यातील गावांना जोडण्यासाठी इतर जिल्हामार्ग 26 हा एकच मार्ग असल्याने या गावांना जाण्यासाठी दुसरा कोणताही रस्ता नसल्याने हा रस्ता व्हावा अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. पुनर्वसित लोकांना न्याय मिळाला पाहिजे, येथील गावांचा विकास झाला पाहिजे, या भूमिकेतून सन 2014 पासून जिल्हा व मंत्रालय स्तरावर मंत्री, शासकीय अधिकारी यांच्यासमवेत बैठका घेऊन, पत्रव्यवहार करुन या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन घेण्यात यश मिळाल्याची माहिती आ. मकरंद पाटील यांनी दिली.