Breaking News

विद्यार्थ्यांनी चतुरपणा व जिद्द जोपासत स्वत:ची स्वप्ने पूर्ण करून संस्थेचा नावलौकिक वाढवावा-छायाताई फिरोदिया


नगर – विद्यार्थी ,पालक,शिक्षक व संस्थाचालक यांच्यातील समन्वय व जिव्हाळा यामुळेच रामकृष्ण फौंडेशनच्या शाळेने उत्तम प्रगती केली असून या शाळेतील भाग्यवान विद्यार्थ्यांनी चतुरपणा व जिद्द जोपासत स्वत:ची स्वप्ने पूर्ण करून संस्थेचा नावलौकिक वाढवावा,असे आवाहन प्रमुख पाहुण्या अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया यांनी केले.

श्रीरामकृष्ण फौंडेशनच्या सेठ नंदलाल धूत इंग्लिश मिडीयम स्कूल व मोहनलाल रामअवतार मानधना ज्युनियर कॉलेजमध्ये आयोजित ३१ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात श्रीमती फिरोदिया बोलत होत्या.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.नंदकुमार झंवर,संस्थेचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब गांधी, उपाध्यक्ष श्री.मोहनलाल मानधना, सचिव डॉ.शरद कोलते, सहसचिव श्री.राजेश झंवर, श्री.बजरंग दरक, श्री.सत्यनारायण सारडा, श्री.अशोक बार्शीकर, श्री.नंदकिशोर शहा, श्री.शरद पल्लोड, श्री.रविंद्र गुजराथी, श्री.लक्ष्मीकांत झंवर, श्री.रामसुख मंत्री, श्री.श्रीगोपाल जाखोटिया, श्री.नंदलाल मणियार, श्री. पुरुषोत्तम पटेल, विद्यालयाच्या प्राचार्या सौ.गीता गिल्डा ,पालकशिक्षक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते,

यावेळी श्रीमती छायाताई फिरोदिया म्हणाल्या कि, विद्यार्थ्यांना आत्ताच्या काळात सर्वच क्षेत्रांमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत त्याचा त्यांनी फायदा घ्यावा, वेळेचे महत्व लक्षात घेऊन चांगले मित्रही आयुष्यात जोडावेत.

संस्थेचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब गांधी यांनी उपस्थितांचे स्वागत करून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

संस्थेचे सचिव डॉ.शरद कोलते सर आपल्या मनोगतात म्हणाले कि, कोणत्याही संस्थेची गुणवत्ता त्यामध्ये असणाऱ्या मानव संसाधनावर अवलंबून आहे. शिक्षकांचे योगदान व पालकांचे प्रोत्साहन बरोबरच शिक्षकांची मेहनत व संचालकाची साथही मिळाल्याने संस्थेची आज पर्यंतची वाटचाल उत्तम घडली आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.नंदकुमार झंवर आपल्या मनोगतात म्हणाले कि, आपली शाळा इंग्रजी माध्यमाची असूनसुद्धा इथे भारतीय संस्कृती जपली जाते. इंग्रजी भाषा येणे आवश्यक आहेच . त्याच बरोबर आपली परंपरा जोपासली जाते हा विश्वास पालकांमध्ये निर्माण करण्यात संस्था यशस्वी ठरली आहे.



प.पु.डोंगरे महाराजांच्या आशीर्वादाने स्थापन झालेले विद्यालय प्रगतीचे उंच शिखर गाठण्याचा प्रयत्न करीत आहे.विद्यालय इंग्लिश मिडीयम स्कूल असून सुद्धा भारतीय संस्कृती जोपासणारे आहे. ४ जुलै १९८८ रोजी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर होत आहे. विद्यालयाने ३१ व्या वर्षात पुढील प्रगतीच्या वाटचालीसाठी पाउल टाकले आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प.पु.डोंगरे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.तसेच विद्यार्थी व शिक्षकांनी भजन व भावपूर्ण अभंग सादर केले.

शाळेची प्रगती विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरून कळत असते. अशा गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांसाठी अनेक मान्यवरांनी विविध पारितोषिके देण्याचे सौजन्य दाखविले आहे. त्यानुसार श्री.मोहनलाल रामअवतार मानधना यांच्यातर्फे ई.१ ली ते ई. १० वीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.संस्थेचे चेअरमन श्री.श्रीगोपालजी धूत यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

प्राचार्या सौ. गीता गिल्डा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अर्चना साळवे व विक्रम गणेशन यांनी केले व आभारही मानले.महाराष्ट्र भक्त सेवा ट्रस्ट तर्फे विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.