Breaking News

विनोद तावडे यांच्याकडून तमाशा कलावंताची उपेक्षा - मंगला बनसोडे

तमाशा कलावंतांच्या आणि फडांच्या अनेक अडचणी आहेत. लोककलावंताच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शासनाकडून मदत मिळावी, यासाठी आम्ही गेल्या ४ वर्षापासून राज्याचे सांस्कृतिक मंत्री म्हणून विनोद तावडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, तावडे आम्हाला वेळच देत नसल्याचा आरोप राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी केला आहे.तमाशा कलावंत आणि फड मालकांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडण्यासाठी अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या वतीने बुधवारी पुण्यात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात केले होते. यावेळी परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष अविष्कार मुळे यांच्यासह इतर तमाशा कलावंत उपस्थित होते