बंद केलेल्या बसेस सुरु कारण्यासाठी मनसेचे आंदोलन
तालुक्यातील गोरगरीबासाठी प्रवासाचे हक्काचे साधन म्हणून बसकडे पाहिले जाते. परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या पाथर्डी आगारातून सकाळी व सायंकाळी सुटणाऱ्या पाथर्डी-पुणे तसेच पाथर्डी- आष्टी यासह काही प्रमुख गाड्या बंद करण्यात आल्या. यामुळे प्रवाशी आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बंद करण्यात आलेल्या बसेस तात्काळ पूर्वीप्रमाणे सुरु कराव्यात, यासाठी मनसेच्यावतीने पाथर्डी बस आगार प्रमुख सु. रा. तरवडे यांच्या दालनात दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी आगार प्रमुखांना महामंडळाच्या ढिसाळ व मनमानी कारभारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने चांगलेच धारेवर धरत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे काही वेळ कार्यालयात वातावरण तणावपूर्ण झाले होते. दिवसांत बंद करण्यात आलेल्या बसेस पुन्हा येत्या ८ सुरू करण्यात याव्या. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्यात येतील, असा इशारा मनसेच्यावतीने देण्यात आला.