Breaking News

दुचाकीला दुचाकीने मागून धडक दिल्याने १ ठार


दुचाकीला दुचाकीने मागून जबर धडक दिल्याने १ जागीच ठार तर, 2 किरकोळ जखमी झाल्याची प्राप्त माहिती मिळाली आहे. जखमीवर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. नागेपल्ली येथील श्री महालक्ष्मी पेट्रोलपंपा जवळ थांबून असलेली गाडी क्र. MH 33 H 0538 या दुचाकीला भरधाव वेगाने येत असलेली दुचाकिने दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान जबर धडक दिल्याने प्रभाकर आलाम (५२) हा जागीच ठार झाल तर अन्य दोन जन जखमी आहे. जखमीमध्ये कपिल तलाडे, शंकर आत्राम आणि अन्य दोन जणांना किरकोळ मार लागल्याने अहेरी उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या वर उपचार सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी करत आहे.