Breaking News

'अफगाणिस्तानच्या खेळाडूंना जास्त संधी द्या'


मुंबई

अफगाणिस्तानला एकमेव कसोटीत दारुण पराभव पत्करावा लागला. कसोटी क्रिकेटमध्ये लागणारा संयम, सध्याच्या घडीला अफगाणिस्तानच्या खेळाडूंकडे दिसून आला नाही. दोन दिवसांमध्ये त्यांचा संघ दोनवेळा बाद झाला. त्यामुळे दुलीप करंडकात खेळल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये नेमकं कसा खेळ केला जातो याचा त्यांना अंदाज येईल त्यामुळे त्यांना जास्तीतजास्त खेळाची संधी द्यावी असे मत कपिलदेव यांनी मांडले. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी अफगाणिस्तानच्या संघाला कसोटी क्रिकेटमध्ये रुळावण्यासाठी अधिकाधीक संधी मिळाली पाहिजे असा सूर लावला होता.