Breaking News

देवगाव सरपंचपदी अशोक पाडाळे बिनविरोध


देवगाव / प्रतिनिधी 
नेवासा तालुक्यातील देवगाव येथील सरपंच पदाची निवडणुक बिनविरोध पार पडली. नेवासा तालुक्याचे विद्यमान आ. बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली सन 2014-15 साली ग्रामविकास पॅनलने बाजी मारत देवगाव येथील ग्रामपंचायतच्या निवडणुकीत 13 पैकी 13 जागावर बाजी मारत समोरच्या पॅनलचा धुव्वा उडविला होता, दरवर्षीच्या ठरल्याप्रमाणे सरपंच व उपसरपंच पद हे सर्वांना यावे अशी त्यांची व गांव पातळीवरील ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह सर्वच जनतेची इच्छा होती, यामुळे ग्रामपंचायत सभागृहामध्ये झालेल्या बैठकीत सार्वनुमते अशोक मोहन पाडाळे यांचा सरपंच पदासाठी एकमेव अर्ज असल्याने, ग्रामपंचायत सर्व सदस्याने यांना पाठींबा दिला. आपण या सरपंच पदाच्या निवडीसाठी सहमत असल्याचे दर्शवून रजिष्टरवर सह्या केल्या यासाठी सुचक म्हणून बाळासाहेब रघुनाथ मुरकुटे होते तर, निवडणुक आधिकारी मिलींद जाधव यांनी काम पाहीले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान नेवासा तालुक्याचे पंचायत समितीचे सदस्य अजित मुरकुटे हे होते. निवड झाल्यानंतर देवगाव येथील मा. चेअरमन गणपत आगळे यांनी पाडाळे यांचा सत्कार केला. यावेळी सर्जेराव मुरकुटे, कचरदास गुंदेचा, कदीरखान पठाण, सलिम शेख, शिवाजी आगळे, विष्णु तागड, अलताफ पटेल, दत्तु लांघे, करणएडके, राहुल शिंदे, संजय वाल्हेकर, राजु पाडाळे, सुनिल जामदार, प्रकाश वाल्हेकर, अशोक वाल्हेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.