अकोले तालुक्यातील ग्रामीण भागात वृक्षारोपन
पिंपळगाव नाकविंदा / प्रतिनिधी
निसर्गाचा ढासाळत चाललेला समतोल, त्यामुळे अवेळी पडणारा पाऊस तसेच कमी पर्जन्यमान यामुळे परिसरात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. या उद्देशाने अकोले तालुक्यातील ग्रामीण आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली आहे. खिरविरे येथील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय, शासकिय दवाखाना, आश्रमशाळा यांचेवतीने वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच गीताबाई रावते, उपसरपंच सुनंदा आवारी, ग्रामसेवक किसन आवारी, सदस्य पंढरीनाथ बेणके, हिराबाई डगळे, त्रींबक पराड, सुदाम आवारी, हारी बेणके, लिलाबाई बेणके, विजय आवारी, बाळू सुर्यवंशी, निवृत्ती डगळे यांसह प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. पिंपळगाव नाकविंदा येथे ग्रामपंचायत, जि.प. प्राथमिक शाळा, महालक्ष्मी विद्यालय यांचेवतीने वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित सरपंच सुमन आढळ, ग्रामसेवक गौतम जानेकर, सदस्य नवनाथ जाधव, नवनाथ बगाड, विश्वास पथवे, वाळीबा लगड, माधव बोर्हाडे, सदु आढळ, वाळीबा नाना लगड, देवा मेंगाळ, मारूती आभाळे, देवराम बगनर यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. पाडोशी येथे ग्रामपंचायत व मधुकरराव पिचड विद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांचेवतीने वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी भैरवनाथ मंदिर परिसरात एक हजार सत्तर झाडे लावण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक, ग्रामसेवक आर. एम. देशमुख, जगन्नाथ साबळे, सुधिर साबळे, गंगाराम साबळे, राजेंद्र साबळे, अविनाश साबळे, विठ्ठल जाधव, गोरख साबळे, डॉ. मिनानाथ साबळे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. त्याचप्रमाणे कोभाळणे, शेरणखेल, समशेरपुर, बाभुळवंडी येथे ग्रामपंचायत, माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा यांचे वतीने वृक्षारोपन करण्यात आले. या वृक्ष लागवडीत प्रामुख्याने वड, पिंपळ, काजू, बदाम, गुलमोहर, लिंब, सिताफळ यांसारख्या झाडांचा मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपनामध्ये वापर करण्यात आला.