Breaking News

सरपंचपदी सदाशिव वराट बिनविरोध


जामखेड / ता. प्रतिनिधी 
तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची असलेल्या साकत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सदाशिव राम वराट यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर व माजी सरपंच हनुमंत पाटील यांच्या ताब्यात ग्रामपंचायत असून निवड झालेले सरपंच त्यांच्याच गटाचे आहेत. सरपंचपदी वराट यांची निवड होताच साकत येथे फटाके वाजवून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
साकत ग्रामपंचायतीची सदस्य संख्या बारा आहे. सरपंच पद इतर मागास प्रवर्गासाठी आहे. 13 सप्टेंबर 2015 रोजी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. आजतागायत सरपंच म्हणून छाया प्रभाकर वराट, चंद्रकांत लक्ष्मण वराट यांनी प्रत्येकी दिड वर्ष सरपंचपद भूषवले आहे. सरपंचपदपदी सदाशिव वराट यांची निवड व्हावी म्हणून, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर व हनुमंत पाटील यांनी सर्व सदस्यांची बैठक घेवून एकमताने नाव सुचवले. 
त्यानुसार शुक्रवारी साकत ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मोहळकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. निवडणूकप्रक्रियेदरम्यान सरपंच पदासाठी सदाशिव राम वराट यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी मोहळकर यांनी सदाशिव वराट यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. सरपंचपदी सदाशिव वराट यांची बिनविरोध निवड होताच, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, हनुमंत पाटील, जि. प. सदस्य अनिल लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत वराट, छाया वराट, दत्ता कोल्हे, मनिषा पाटील, सोजरबाई वराट, अनिता घोडेस्वार, जालिंदर नेमाणे, हरिदास मुरुमकर, दिलीप घोलप, मिना अडसूळ, ललिता कोल्हे, अशोक वराट, भाजपा युवामोर्चा सरचिटनीस ईश्‍वर मुरुमकर, सुभाष कोल्हे, वाल्मिक कोल्हे, दत्ता कोल्हे, गणेश अडसूळ, दादा वराट, दिलीप घोलप, जालिंदर नेमाने, श्रीराम घोडेस्वार व साकत गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.