Breaking News

कृतीपत्रिका मुल्यमापन प्रशिक्षण उत्साहात


कर्जत / प्रतिनिधी 
बारावीच्या इंग्रजी विषयाचे बदलत्या स्वरुपानुसार कृतीपत्रिका मुल्यमापन प्रशिक्षण कर्जतच्या महात्मा गांधी विद्यालयात शुक्रवारी संपन्न झाले. केंद्र संचालक सुनील वाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
गेल्या वर्षी अकरावीच्या वर्गासाठी कृतीपत्रिका मुल्यमापन पध्दती वापरण्यात आली. त्याच धर्तीवर चालु वर्षात बारावीच्या भाषा विषयांच्या मुल्यमापन पध्दतीत बदल करण्यात आलेला आहे. त्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बदलत्या स्वरुपानुसार विद्यार्थ्यांचे विविध कृतींद्वारे मुल्यमापन केले जाणार आहे. यावेळी सोलापूरचे रियाझ बळसंगकर, सांगोल्याचे चांगदेव माळी यांनी बारावीला इंग्रजीचे अध्यापन करणार्‍या शिक्षकांना प्रशिक्षण दिले. आयोजकांच्या वतीने तज्ज्ञ मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रा. भाऊसाहेब बालगुडे यांनी केले. प्रा. विजय मगर यांनी आभार मानले.