Breaking News

विद्यार्थ्यांनी लहानपणीच ध्येय ठरवावे : काटमोरे देमनवाडी शाळेस वासुदेव फर्निचरच्या वतीने फर्निचर भेट

विद्यार्थ्यांनी लहानपणीच ध्येय ठरवून घ्यावे. ध्येयपुर्तीसाठी सतत प्रयत्न करावेत. विद्यार्थी दशेत विविध माध्यमातून ज्ञान ग्रहण केल्यास, जीवनात ते उपयुक्त ठरते असे विचार जिल्हा शिक्षणाधिकारी रमाकांत काटमोरे यांनी मांडले. कर्जत तालुक्यातील देमनवाडी जिल्हा परिषद शाळेत फर्निचर वितरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अळसुंदेचे सरपंच एकनाथ वाघमारे होते. कर्जतचे गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते मेघराज बजाज, उपसरपंच एकनाथ साळुंके, सुनिता देवकाते, प्रकाश पालवे, सोमनाथ गोपाळघरे, संतोष खंडागळे, शिक्षिका विजया रंधवे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. कार्यक्रमासाठी पालक व महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. ग्रामपंचायतच्या वतीने शाळेस एलईडी व स्मार्ट टीव्ही संच देण्यात आला.शिक्षणाधिकारी काटमोरे यांच्या हस्ते शाळेतील डिजिटल कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध शैक्षणिक पीपीटी पाहून उपस्थित मान्यवर भारावून गेले.
प्रास्ताविकातुन मुख्याध्यापक रविंद्र राऊत यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती दिली. देमनवाडी शाळेचा ब्लॉग तयार केला असून, त्यावर शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती उपलब्ध करुन दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. तीन महिन्यात पहिलीचा वर्ग प्रगत करण्याचे आवाहन केले.सूत्रसंचालन संतोषकुमार खंडागळे यांनी तर, आभार विजया रंधवे-राऊत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश अनारसे, भाऊसाहेब खरात, शरद ढवळे, शिवदास यादव, आनंद परदेशी आदींनी प्रयत्न केले.

विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरील आनंदाने सुखावतो : बजाज 
चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून सुखावतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळत नाहीत. त्यासाठी विविध शाळेत फर्निचरचे मोफत वाटप करण्याचा उपक्रम सुरु आहे, त्यांनी देमनवाडी शाळेस 2 टेबल, 2 कपाटे व 1 चप्पल स्टॅण्ड भेट दिले. मुलांची शैक्षणिक प्रगती व संगणकाचे कौशल्य पाहून बजाज यांनी शिक्षकांचे कौतुक केले. दुर्गम अशा डोंगराच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा वाडीतील शाळेचा सुंदर व स्वच्छ परिसर पाहून समाधान व्यक्त करित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.