पोलीस ठाण्याच्या आवारात बेमुदत उपोषण
पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या मारहाणीच्या गुन्ह्यात पोलीस निरीक्षक यांनी आरोपींना न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी मदत केली. या कारणावरून तालुक्यातील आगासखांड येथील ज्ञानदेव कराड यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात बेमुदत उपोषण करत पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांची बदली करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
याबाबत तक्रारदार ज्ञानदेव कराड यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना तक्रार दिली . तक्रारीत म्हटले आहे की,मागील महिन्यात १९ तारखेला मला व माझ्या पत्नीला जमिनीच्या वादावरून मारहाण करण्यात आली होती.मारहाणीत माझ्या डोक्याला जबर मार लागला होता.यावेळी नगरला खाजगी दवाखान्यात उपचार घेत होतो . त्यावेळी नगरच्या तोफखाना पोलिसांनी २१ ऑक्टोबर रोजी माझा जबाब घेत पुढील कारवाई साठी त्याचदिवशी पाथर्डी पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्याकडे पाठवला होता.

मात्र,पोलीस निरीक्षक यांनी सदरील जबाबावरून तात्काळ गुन्हा दाखल करण्याऐवजी आठ दिवस सदरील जबाब तसाच जवळ बाळगून ठेवला.त्यानंतर गुन्हा गंभीर असतांना पोलीस निरीक्षक यांनी गुन्ह्यात आरोपींना मदत व्हावी या हेतूने गुन्हा दाखल केला.याबाबत नंतर चौकशी करण्यासाठी पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्याकडे जाऊन गुन्ह्यात वाढीव कलम लावण्याची मागणी केली असता पोलीस निरीक्षक यांनी पाच हजार रुपये दिले तरच वाढीव कलम लावण्यात येईल असे सांगितले.
त्यानंतर मी पाच हजार रुपये दिल्यावर ६ नोव्हेंबर रोजी न्यायलयात वाढीव कलम लावण्याचा अर्ज पोलिसांनी दिला.तसेच यातील आरोपीना न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पोलीस निरीक्षक यांनी आरोपींना मदत केली.त्यामुळे याबाबत पोलीस निरीक्षक यांची चौकशी करून कारवाई करावी . या प्रमुख मागणीसाठी ज्ञानदेव कराड यांनी जखमी अवस्थेत पोलीस ठाण्या समोर बेमुदत उपोषण केले.दरम्यान,सायंकाळी उशिरा तपासी अधिकारी यांनी आरोपींना लवकर अटक करू असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.