Breaking News

10 वी, 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


कुकाणा / प्रतिनिधी 
संत नागेबाबा पतसंस्था कुकाणा शाखा यांच्यावतीने 10 वी आणि 12 वीतील गुंणवत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कुकाणा येथील अशोकशेठ चौधरी कुकाणा विद्यालयाचे माजी. प्राचार्य यशवंत एरंडे, क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे कार्यकर्ते बाळासाहेब उंडे, राष्ट्रवादी किसान आघाडीचे बबन पिसोटे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर, यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अश्‍विनी जावळे, रोहिनी खाटिक, ऋतुजा जाधव, सिध्दार्थ दरवडे, कुणाल औटी, बाबासाहेब धायगुडे, सुजित काकडे, कार्तिक कुटे, महादेव मुंगसे या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. ओमकार कॉम्प्युटरचे प्रशिक्षक दरवडे तसेच श्री संत नागेबाबा संस्थेचे योगेश गिरी, लक्ष्मण गव्हाणे, योगेश सुरासे, आनिल खरात, विकास साळवे, अजित दरवडे आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.