Breaking News

विनायक सामंत मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी


मुंबई

माजी यष्टीरक्षक फलंदाज विनायक सामंत यांची मुंबई रणजी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून मुंबई क्रिकेट असोसिएशनने विल्कीन मोटा यांची मुंबईच्या १९ वर्षाखालील संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली आहे. एमसीएचे सह सचिव उन्मेश खानविलकर यांनी सामंत व विल्कीन मोटा यांच्या नेमणूकीबद्दलची घोषणा केली आहे. आगामी रणजी हंगामापर्यंत विनायक सामंत मुंबईचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. 

माजी प्रशिक्षक समीर दिघे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुंबईच्या प्रशिक्षकपदाची जागा रिक्त होती. विनायक सामंत यांनी राजस्थानचे माजी खेळाडू प्रदीप सुंदरम आणि मुंबईचा माजी फिरकी गोलंदाज रमेश पोवार यांच्यावर मात करत प्रशिक्षकपद मिळवलं आहे.