Breaking News

जीएसटी महसुलात वाढ एका महिन्यात तब्बल 95 हजार 610 कोटी जमा


नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कराच्या जूनमधील संकलनात वाढ झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे. जूनमधील संकलन 94 हजार 016 कोटींवरुन वाढून 95 हजार 610 कोटी झाल्याचे मंत्रालयाने जाहीर केले आहे. भारतात जीएसटी करप्रणाली लागू होऊन नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या आर्थिक वर्षात जीएसटीचे मा सिक सरासरी संकलन 89 हजार 885 कोटी झाले आहे. जीएसटीच्या एकूण संकलनामध्ये केंद्रीय जीएसटी 15 हजार 968 कोटी, राज्य जीएसटी 22 हजार 021, एक ात्मिक जीएसटी 49,498 (आयातीमधून 24 हजार 493 कोटी) आणि सेस 8 हजार 122 कोटी (आयातीमधून 773 कोटी)चा समावेश आहे. मे ते जून 2018 या कालावधीत एकूण 64.69 लाख जीएसटीआर 3 बी रिटर्न्स दाखल करण्यात आले आहे.