Breaking News

पुणे फेस्टिव्हल 2017 चे उदघाटन खा. शत्रुघ्न सिन्हा यांच्या हस्ते

पुणे, दि. 02, सप्टेंबर - पुणे फेस्टिव्हल 2017 चे उदघाटन ज्येष्ठ अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा व दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते करण्यात  आले.यावेळी राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर  डॉ. सिद्धार्थ धेंडे, पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक सुरेश कलमाडी, ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ आदी उपस्थित होते. तत्पुर्वी फेस्टिव्हलच्या सुरुवातीला अभिनेत्री  शर्वरी जमेनिस, मृण्मयी देशपांडे, राधा सागर आणि नकुल घाणेकर आणि सहकार्‍यांनी गणेशवंदना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर त्यानंतर भार्गवी  चिरमुले, नंदेश उमप आणि अभ्यंग कुवळेकर यांनी महाराष्ट्र देशा.. शिवबाच्या देशा या पोवाड्याचे सादरीकरण केले. त्यानंतर बॉलिवूड टोलिवूड कर्यक्रमात अभिनेत्री ,  पूजा सावंत, नेहा महाजन, तेजस्विनी लोणारी, वैशाली जाधव, वैष्णवी पाटील यांनी सादर केलेल्या रात्र धुंदीत ही जागवा, अप्सरा आली, दिवाणी हो गयी, आ  आंटी अम्लपुरे, धतींग नाच..धतींग नाच, या गाण्यांवर नृत्यविष्कार सादर केला. तर अभिनेत्री उर्मीला मांतोडकर हिने शीला की जवानी या गीतावर बहारदार नृत्य  करत उपस्थितांची दाद मिळवली.