'समुपदेशन प्रसारण केंद्र' म्हणून ‘प्रवरा’ची निवड
प्रवरानगर : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी या प्रवेश देणाऱ्या उमेदवार आणि त्यांच्या पालकांच्या समुपदेशनासाठी शासनाने प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाची 'समुपदेशन प्रसारण केंद्र' म्हणून निवड केली आहे. शनिवारी {दि. २१} सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत ‘व्हिडिओ कॉन्सफरिंग’द्वारे सीईटी परीक्षेसंबंधी सर्व माहिती देण्यात येईल, माहिती प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांनी दिली. प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील या समुपदेशन प्रसारण केंद्राच्या सुविधेमुळे प्रवरा परिसर आणि राहता तालुक्यांसह इतर तालुक्यातील आणि जिल्ह्यातील विद्यार्थी आणि पालकांनी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवरानगर येथील प्रवरा ग्रामीण औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.