Breaking News

पोलीस एन्काउंटरमध्ये 4 गुंड ठार

नवी दिल्ली - दिल्ली पोलीस स्पेशल सेल आणि गुंड राजेश भारती टोळीमध्ये झालेल्या चकमकीत 4 गुन्हेगार मारले गेले आहेत. तर, 6 पोलीस जखमी झाले आहेत. दक्षिण दिल्लीच्या छत्तरपूर भागात ही चकमक झाली. गुंड राजेश भारतीही या चकमकीत मारला गेला असून, त्याच्यावर 1 लाख रुपयांचे बक्षिस दिल्ली पोलिसांनी जाहीर केले होते. राजेश हरियाणा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला होता. सुरक्षेसाठी पोलिसांनी हा परिसर मोकळा केला आहे.