Breaking News

नीरव मोदीविरुद्ध ‘रेड कॉर्नर’ नोटीस

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटींचा चुना लावून पसार झालेला नीरव मोदी याच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. घोटाळ्याप्रकरणी नीरव मोदी याच्या विरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग तसेच ईडीने इंटरपोलकडे रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याची विनंती केली होती. ‘पीएनबी’च्या 13 हजार कोटींच्या घोटाळ्यात नीरव मोदी सूत्रधार आहे. घोटाळ्याची चौकशी अंमलबाजावणी संचलनालय (ईडी) आणि सीबीआय करत आहे. याप्रकरणी सीबीआय आणि ईडीने स्वतंत्रपणे आरोपपत्र दाखल केले आहेत. नीरव मोदीने भारतातून पळ काढल्यानंतर भारत सरकारने त्याचा पासपोर्ट रद्द केला आहे. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने लूकआऊट नोटीसही जारी केली आहे.