Breaking News

पत्रकार संघाकडून 500 वारकर्‍यांना रेनकोट वाटप


अहमदनगर / प्रतिनिधी
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातील वारकरी मार्गस्थ झाले आहे. पायी दिंड्यांचे शहरासह जिल्हाभरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संंघटक संजय भोकरे, राज्य अध्यक्ष राजा माने, कार्याध्यक्ष वसंत मुंढे, उद्योजक सचिन लबडे यांच्या कल्पनेतून हा उपक्रम सुरु करण्यात येथे वारकर्‍यांचे स्वागत करून 500 वारकर्‍यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
मजल दरमजल करीत पंढरीच्या दिशेने हजारो दिंड्यांनी प्रस्थांन ठेवले आहे. श्रीरामपूरसह जिल्ह्याच्या उत्तर भागासह नाशिक जिल्ह्यातील बहुतेक दिंड्या नगर-मनमाड मार्गे नगर शहरातून जातात. त्यात अडबंगनाथ महाराज, अगस्ती ऋषीजी महाराज, महिपती महाराज आदी दिंड्या याच मार्गाने पंढरपुरच्या दिशेने वाटचाल करत आहेत. या प्रवासात ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता बालकांस वृद्ध वारकरी भक्तीभावाने मार्गक्रमण करत आहेत. राहुरी तालुक्यातील नांदगाव येथे नगर-मनमाड मार्गावर सकाळच्या नाष्ट्यासाठी श्री क्षेत्र अगस्ती ऋषीजी महाराज पालखी दिंडी थांबली असता, संघटनेचे प्रदेश सरचिटणीस विश्‍वास आरोटे यांच्या हस्ते वारकर्‍यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी जि.प.च्या अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, अगस्ती देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. के. डी. धुमाळ, दिंडीचे अध्यक्ष राजेंद्र महाराज नवले, देवस्थान विश्‍वस्त दीपक महाराज देशमुख, संघटनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य पत्रकार दीपक कांबळे, तालुकाध्यक्ष गीताराम शेटे, तालुका कार्याध्यक्ष बंडू म्हसे, सुनील भुजाडी, अगस्ती साखर कारखान्याचे माजी संचालक अ‍ॅड. शांताराम वाळूंज, अण्णासाहेब चौधरी, अरुण माळवे आदी उपस्थित होते.
यावेळी आरोटे म्हणाले, वारकरी कुटूंबातीलच आहे, या समाजाचे पत्रकार म्हणून आपणही देणे लागतो, या हेतुने पत्रकार संघाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. सोलापूर जिल्ह्यातही संघाच्यावतीने सर्व वारकर्‍यांना विविध साहित्याचे वाटप केले जाते, दरवर्षी हा उपक्रम राबवला जात असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार संघाने राबवलेल्या उपक्रमाचे वारकर्‍यांनी कौतूक केले.