Breaking News

मुख्यमंत्र्यांकडून आमदार यशोमती ठाकूर यांचे सांत्वन



अमरावती : 
माजी आमदार भैय्यासाहेब ठाकूर यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन दिवंगत आमदार ठाकूर यांच्या कन्या तथा आमदार श्रीमती यशोमती ठाकूर यांची भेट घेतली व सांत्वन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भैय्यासाहेब ठाकूर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून श्रद्धांजली दिली. पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, आमदार अनिल बोंडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.