Breaking News

दरीत बस कोसळून 47 जण ठार

उत्तराखंड उत्तराखंडच्या नैनीडांडाजवळ बस दरीमध्ये कोसळून 47 जणांचा मृत्यू झाला. अपघातामधील जखमींची प्रकृती चिंताजनकआहे. एनडीआरएफचे पथक तत्काळ घटनास्थळी रवाना झाले असून बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात आली आहे. जखमींना हेलिकॉप्टरद्वारे रुग्णालयात नेण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 47 जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात यश आलं आहे. पण अद्याप अनेकजण जखमी असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.