Breaking News

वारीसाठी पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त

सोलापूर - आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण पोलिसांची तयारी सुरू झाली आहे. वाहतूक नियोजनावर अधिक भर राहील, अशी माहिती पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी दिली. शंभर दुचाकींचा वापर पालखी सोहळ्यासमवेत येणार्‍या वाहनांची कोंडी कमी करण्यासाठी होईल. बंदोबस्तासाठी शेजारच्या पाच जिल्ह्यांमधील बंदोबस्त मागविला आहे. चार हजार पोलिस, साडेतीनशे कर्मचारी, 2200 होमगार्ड, 300 हजार स्वयंसेवक मदतीला आहेत. मिसिंग सेल, बीडीएस पथक, वॉच टॉवर राहतील. पंढरपुरामध्ये सध्या भाडेकरू यांची माहिती संकलित करण्यात येत आहे. पंढरपूरला जोडणार्‍या नऊ पैकी सात रस्त्याचे काम सुरू आहे. एसटीचे चार ऐवजी यंदाच्यावर्षी तीनच डेपो असतील.14 ठिकाणी पार्किंगसाठी जागा घेतली आहे. त्यात किमान अडीच हजार वाहने थांबतील. सहाशे माहिती फलक पालखी मार्गावर राहतील. माहिती देणारे 1000 स्टिकर माहितीसाठी लावणार असल्याचे प्रभू यांनी सांगितले.