जळगावमधील खडसे समर्थक 15 नगरसेवक देणार राजीनामा
जळगाव, दि. 01 - राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांचा पदभार कमी करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मात्र असे असताना एकनाथ खडसेंच्या समर्थकांनी जळगावमध्ये शक्तीप्रदर्शन सुरु केले आहे. कारण जळगावमधील भाजपचे 15 नगरसेवक खडसेंच्या समर्थनात उद्या राजीनामा देणार आहेत.
हे 15 नगरसेवक उद्या आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडे देती
ल. गेल्या 15 दिवसांमध्ये एकामोगामाग एक आरोप खडसे यांच्यावर होत असल्यामुळे एकनाथ खडसेंचे महसूलमंत्रिपद काढून घेतले जाऊ शकते अशी बातमी आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगावमधून खडसेंच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शनाला सुरुवात केली आहे.
उद्या प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे राजीनामे देण्याचा निर्णय 15 नगरसेवकांनी घेतला असून, या संबंधी या नगरसेवकांनी आज जळगाव येथे बैठकीत हा निर्णय जाहीर केला. यावेळी नगरसेवकांनी अंजली दमानिया यांचाही निषेध त्यांनी केला. त्यामुळे राजीनाम्याच्या शक्तीप्रदर्शनावर भाजपचे नेतृत्व काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे आहे.